नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

गुरुजी परीक्षेपूर्वीच नापास

म. टा. प्रतिनिधी, नागपूर Nov 17, 2013, 01.30 AM
========================================

टीईटीसाठी सहा लाख अर्ज

मंगळवार, 12 नोव्हेंबर 2013 - 03:00 AM IST

मुंबई - प्राथमिक शिक्षकांच्या किमान व्यावसायिक अर्हतेसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल सहा लाख 20 हजार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी केली आहे. टीईटीसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. रात्री 12 वाजेपर्यंत ही मुदत होती; परंतु सायंकाळपर्यंतच सुमारे 6 लाख 20 हजार ऑनलाईन अर्जांची नोंद झाली. यापैकी चार लाख अर्ज पहिल्या पेपरसाठी; तर उर्वरित पेपर-2 साठी आले आहेत. टीईटी येत्या 15 डिसेंबर रोजी होणार आहे.

कनिष्ठ प्राथमिक म्हणजेच पहिली ते पाचवीच्या शिक्षकांना पेपर-1 आणि वरिष्ठ प्राथमिक म्हणजे सहावी ते आठवीच्या शिक्षकांना पेपर-2 अशा स्वतंत्र प्रश्‍नपत्रिका असतील. दोन्ही गटांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दोन्ही प्रश्‍नपत्रिका सोडवणे बंधनकारक राहील. या पात्रता परीक्षेच्या निमित्ताने पहिल्यांदाच बीएड झालेल्या उमेदवारांनाही प्राथमिक शिक्षक पदासाठी नशीब अजमावता येईल.

ही परीक्षा घेण्याची जबाबदारी असणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डी. व्ही. सहस्रबुद्धे म्हणाले, "यंदा प्रथमच ही परीक्षा होत असल्याने कमी वेळ मिळाला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्रांच्या कन्फर्मेशनसाठी जिल्हा केंद्रावर यावे लागले. काही उमेदवारांना यामुळे त्रास झाला. पण पुढील वर्षीपासून केंद्रांची संख्या वाढवून याबाबत काळजी घेण्यात येईल. सर्व उमेदवारांना येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत हॉलतिकीट मिळतील. तरीही ज्या उमेदवारांना परीक्षेच्या दिवसापर्यंत ऑनलाईन हॉल तिकीट मिळणार नाही, त्यांना कन्फर्म केलेल्या ऑनलाईन अर्जाची सही शिक्‍क्‍याची प्रत दाखवून परीक्षेला बसता येईल.'

बॅंक चलनची अंतिम मुदत 12 नोव्हेंबर; तर जिल्हा शिक्षण कार्यालयातून कन्फर्मेशन पेज आणि चलन पावती घेण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर आहे.

सकाळ वृत्तसेवा 

एमपीएससी (MPSC) परीक्षा २०१४ - वेळापत्रक जाहीर...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१४ मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. या सर्व परीक्षांचे अभ्यासक्रम व जुन्या प्रश्नपत्रिका www.mpsc.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.


१) राज्यसेवा परीक्षा
राज्य सरकारच्या सेवेतील राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील विविध पदे या परीक्षेद्वारे भरण्यात येतात. यात उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक/ सहायक पोलिस आयुक्त, तहसिलदार, विक्रीकर अधिकारी, उपनिबंधक सहकारी संस्था, गटविकास अधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद मुख्याधिकारी, कक्ष अधिकारी इ. १९ पदांसाठी निवड केली जाते.

जाहिरात प्रकाशित/ अर्ज भरणे - डिसेंबर २०१३
पूर्व परीक्षा - २ फेब्रुवारी २०१४
मुख्य परीक्षा - ३०, ३१मे व १ जून २०१४

२) पोलिस उपनिरीक्षक परीक्षा
ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक व मुलाखत या टप्प्यांतून होते.

जाहिरात प्रकाशित/ अर्ज भरणे - फेब्रुवारी २०१४
पूर्व परीक्षा - ६ एप्रिल २०१४
मुख्य परीक्षा - २७ जुलै २०१४

३) विक्रीकर निरीक्षक परीक्षा
राज्य सरकारच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत म्हणजे विक्रीकर. विक्रीकराची वसुली, व्यवस्थापन इत्यादींसाठी विक्रीकर निरीक्षकांची भूमिका मह्त्त्वाची असते.

जाहिरात प्रकाशित/ अर्ज भरणे - मे २०१४
पूर्व परीक्षा - १३ जुलै २०१४
मुख्य परीक्षा - २३ नोव्हेंबर २०१४

४) सहायक परीक्षा
मुंबईतील मंत्रालयातील विविध विभाग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात सहायकांची नियुक्ती होते.

जाहिरात प्रकाशित/ अर्ज भरणे - एप्रिल २०१४
पूर्व परीक्षा - १५ जून २०१४
मुख्य परीक्षा - २१ सप्टेंबर २०१४

५) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
राज्य सरकारच्या वनसेवेतील राजपत्रित, गट - अ व गट - ब ची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र वन सेवा परीक्षा घेण्यात येते. जंगलाची मालकी, व्यवस्थापन, संवर्धन हे सरकारकडे असते. त्यामुळे फॉरेस्ट्रीमध्ये करिअर करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण आहे.
पदे ः १) सहायक वनसंरक्षक
 ( असिस्टंट कॉन्झर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट) - ( गट - अ)
२) वनक्षेत्रपाल
 (रेंज फॉरेस्ट ऑफिसर) - ( गट - ब)

जाहिरात प्रकाशित / अर्ज भरणे - नोव्हेंबर २०१३
पूर्व परीक्षा - २७ एप्रिल २०१४
मुख्य परीक्षा - २७-२८ सप्टेंबर २०१४

६) लिपिक - टंकलेखक परीक्षा
मंत्रालयीन विभाग व मुंबईतील राज्य सरकारच्या विविध कार्यालयातील लिपिक-टंकलेखक(मराठी) व लिपिक-टंकलेखक(इंग्रजी) या गट - क संवर्गातील भरतीसाठी ही परीक्षा आहे. (लिपिक - टंकलेखक (मराठी) पदासाठी मराठी टंकलेखनाचा (टायपिंग) वेग ३० शब्द प्रति मिनिट तर लिपिक - टंकलेखक(इंग्रजी) पदासाठी इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० शब्द प्रति मिनिट हवा. या वेगाबाबतची शासकीय परीक्षा मंडळाची टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.)

जाहिरात प्रकाशित/ अर्ज भरणे - मार्च २०१४
लेखी परीक्षा - १८ मे २०१४ 

कोल्हापूर सैन्यभरती मेळाव्याचे ४ ते ११ जानेवारी २०१४ दरम्यान आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात 191 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहाय्यक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण- तांत्रिक (32 जागा), प्राचार्य व उपप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय/केंद्र निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार-तांत्रिक (71 जागा), प्राचार्य व उपप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक/ अभियांत्रिकी अधीक्षक, टेक्निकल हायस्कूल/केंद्र (88 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2013 आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in वwww.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.


करिअर मेळाव्यांतून बेरोजगारांची फसवणूक

करिअर मेळाव्यांच्या नावाखाली ब्रँडेड कंपन्यांचे लोगो जाहिरातींवर वापरून बेरोजगार तरुणाईकडून नोंदणी रक्कम लाटणाऱ्या संस्थांचा विदर्भात सुळसुळाट झाला आहे. अनेक जिल्ह्य़ांमध्ये करिअर मेळाव्यांचे पीक आले आहे. यासाठी नोंदणीच्या नावाखाली मोठी रक्कम बेरोजगारांकडून घेतली जाते. करिअर फेअरमध्ये लावलेल्या आकर्षक जाहिरातींवर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या लोगोचा वापर करून त्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून आमिष बेरोजगारांना दाखवले जात आहे. त्यामुळे बेरोजगार अशा करिअर मेळाव्यांच्या जाळ्यात अडकून स्वत:च्या पायावर आर्थिक धोंडा पाडून घेत आहेत. प्रत्यक्षात यापैकी कोणालाही बडय़ा कंपन्यांमध्येनोकरी मिळालेली नाही.

करिअर मेळावा हा आता प्रस्थापित धंदा झाला आहे. मार्केटिंग फंडे वापरून पैसा कमावण्याचे तंत्र अशा संस्थांनी अवगत केले आहे. हाती काहीच लागत नसतानाही बेरोजगार यात अडकत चालले असल्याची स्थिती आहे. मेळावे आयोजित करणाऱ्या या संस्थांच्या विश्वासर्हतेची चौकशी केली जात नाही वा त्यांच्याविरोधात तक्रारीही येत नाहीत. नोकरीच्या शोधातील हजारो बेरोजगारांचे रजिस्ट्रेशनची रक्कम भरून मोठे नुकसान होत आहे. ही रक्कम हजारो रुपयात असते. काही बेरोजगारांनी 'लोकसत्ता' कार्यालयात येऊन या फसवणुकीची माहिती दिली. यापैकी एकाला मोठय़ा पगाराची नोकरी असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात कंपनीने ६ हजार रुपयांवर पगार देणार नाही, असे त्याला सांगितले. जॉब रजिस्ट्रेशनसाठी भरलेली रक्कम पाण्यात गेल्याची आपबिती त्याने सांगितली.

अनेक करिअर मेळाव्यांमध्ये रजिस्ट्रेशन करणारा एक विद्यार्थी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाला, दोन वर्षांपूर्वी अभियांत्रिकीचीपदवी ७५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालो. करिअर मेळाव्यातील जाहिरातींना भुलून अनेकवेळा रजिस्ट्रेशन केले. दोन वर्षांपासून चांगल्या नोकरीची वाट पाहत आहे. अद्याप कुठूनही कॉल आलेला नाही. सध्या एका मोबाईल कंपनीत विक्री प्रतिनिधी म्हणून ७ हजार रुपये पगारावर काम करीत आहे. असे करिअर मेळावे म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे लोगो करिअर मेळाव्यात सर्रास वापरले जात आहेत. बेरोजगारांना जाळ्यात ओढण्यासाठी याचा वापर केला जात असल्याने याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

करिअर क्षेत्रातील एका तज्ज्ञाशी संपर्क साधला असता असे प्रकार मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे त्याने मान्य केले. काही संस्थांचा करिअर मेळाव्यासाठी नोंदणी शुल्क घेऊन महिन्याला कोटय़वधी रुपये कमावण्याचा धंदा झाला आहे. यातून रोजगाराच्या शोधात असलेल्यांचा काहीही फायदा होत नाही. कंपन्यांची गरज आणि अपेक्षा यात कुठेही ताळमेळ बसत नाही. नोकरी असली तरी जेवढा सांगितला जातो तेवढा पगार दिला जात नाही, असेही त्याने स्पष्ट केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूर शहरात कॅम्पस सिलेक्शन करण्यासाठी येणाऱ्या कंपन्यांची संख्या यंदा कमी झाली आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षांला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने विदर्भातील महाविद्यालयांमधून विद्यार्थी-विद्यार्थिनींचे लोंढे नोकरीच्या अपेक्षेने बाहेर पडत आहेत. त्यांच्यापैकी फारच थोडय़ांना नोक ऱ्या उलपब्ध होतात.

MPSC मार्फत महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा भरती 149 जागा


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय तंत्र निकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा , गट-अ, उच्च व तंत्र शिक्षण विभागातील माहिती तंत्रज्ञान 14 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी 32 जागा, संगणक अभियांत्रिकी 26 जागा, यंत्र अभियांत्रिकी 37 जागा, 
अणुविद्युत 38 जागा व धातूशास्त्र 2 जागा असे एकूण 149 पदे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये 27 सप्टेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

वाशीम जिल्हा परिषद मध्ये भरती


जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा परिषद, वाशीम यांच्या आस्थापनेवरील आरोग्य सेवक(पुरुष) 2 जागा, आरोग्य सेवक(महिला) 9 जागा, कनिष्ठ सहायक 3 जागा व परिचर 39 जागा असे एकुण 53 पदे 
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 आक्टोंबर 2013



स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

विधानसभा सचिवालयात "सहायक" (गट- ब) पदाची भरती

महाराष्ट्र विधानसभा सचिवालयातील "सहायक" 
(गट- ब) पदाच्या 16 जागा 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 10 आक्टोंबर 2013 



विधानसभा सचिवालयात "लिपिक-टंकलेखक" (गट- क) पदाची भरती

महाराष्ट्र विधानसभा सचिवालयातील "लिपिक-टंकलेखक" 
(गट-क) पदाच्या 13 जागा
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 17 आक्टोंबर 2013


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी "Like" करा


                           
                          

बीड जिल्हा परिषद मध्ये आरोग्यसेवक / परिचर पदाच्या 51 जागा


जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा परिषद, बीड यांच्या आस्थापनेवरील आरोग्य सेवक 15 जागा व परिचर 36 जागा असे एकुण 51 पदे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 आक्टोंबर 2013 आहे. 




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षकाच्या 600 जागा

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक (600 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 25 सप्टेंबर 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये भरती


जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील पर्यवेक्षिका 5 जागा, शिक्षण विस्तार अधिकारी 4 जागा व परिचर 19 जागा असे
एकुण 28 पदे 
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2013 आहे.



स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात 28 जागा


जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक 15 जागा, वाहन चालक 2 जागा व शिपाई/चौकीदार 11 जागा असे एकुण 28 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 आक्टोंबर 2013




जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक 15 जागा, वाहन चालक 2 जागा व शिपाई/चौकीदार 11 जागा असे एकुण 28 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 आक्टोंबर 2013


जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक 15 जागा, वाहन चालक 2 जागा व शिपाई/चौकीदार 11 जागा असे एकुण 28 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 आक्टोंबर 2013



जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक 15 जागा, वाहन चालक 2 जागा व शिपाई/चौकीदार 11 जागा असे एकुण 28 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 आक्टोंबर 2013


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा