नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

टीईटी परिक्षा पुढे ढकला - अभाविसे१६ नोव्हेंबर २०१३ - -भावी शिक्षकांसाठी घेण्यात येणार्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परिक्षेच्या तारखेत बदल करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली असून याबाबत आज जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. याबाबत निवेदनात म्हटले की, शासनाने या वर्षापासून प्राथमिक शिक्षकांकरीता शिक्षक पात्रता परिक्षा घेण्याचे ठरवले आहे.
ही परिक्षा यावर्षी १५ डिसेंबर पासून सुरू होत आहे. या दिवशीच धुळे महानगर पालिकेची निवडणुक होणार आहे.

केंन्द्रशासन, राज्यशासन तसेच इतर सामाजिक संघटना लोकांमध्ये मतदानाबद्दल जागृती मोहिम हाती घेत असतांना मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यासाठी प्रयत्नशिल आहे. शिक्षक पात्रता परिक्षेची तारीख व निवडणुकीच्या मतदानाची तारीख दि.१५ डिसेंबर रोजी असल्यामुळे शहरातील बराचसा तरूण वर्ग या मतदानापासून वंचित राहणार आहे. या तारखेलाच काही विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी दोन पेपर घेण्यात येणार आहेत.त्यामुळे त्या दिवसभराचे या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक व्यस्त राहणार आहे. तरी शिक्षक पात्रता परीक्षा या १५ डिसेंबरला न घेता पुढे ढकलावी अन्यथा अभाविप तीव्र आंदोलन करेल. असेही पत्रकात म्हटले आहे.निवेदनावर नितीन ठाकूर, गौरांग शहा, विशाल सोनगीरे, बाजीराव पावरा, अध्यक्ष नितीन ठाकूर, पावरा दिनेश, गौरांग शहा, पावरा शंकर, पावरा सतिश, पावरा बाजीराव, आगलावे किरण, विशाल सोनगिरे यांच्या स्वाक्षर्या आहेत.

टीईटी अर्ज स्वीकृती महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फतशिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) करीता आवेदन पत्र स्वीकृती सुरू आहे. पुर्वनियोजित वेळापत्राप्रमाणे दि.१४ नोव्हेंबर रोजी मोहरमनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तथापी शासनाने सुधारीत वेळापत्रानुसार मोहरमनिमित्त दि.१४ ऐवजी १५ नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केल्याने टीईटी परीक्षा अर्ज स्वीकृती दि.१४ नोव्हेंबर रोजी सुरू राहील. तसेच दि.१५ रोजी मोहरमनिमित्त सुट्टी असल्याने अर्ज स्वीकृती बंद राहील. टीईटी परीक्षा आवेदन पत्र स्वीकृतीचा अंतिम दि.१६ नोव्हेंबर राहील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे आवाहन शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम यांनी केले आहे.