नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

मराठी विनाअनुदानित शाळांना मिळणार अनुदान

मराठी विनाअनुदानित शाळांना मिळणार अनुदान

औरंगाबाद - राज्यातील "कायम' शब्द वगळलेल्या खासगी विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असलेल्या प्राथमिक शाळा व वर्ग तुकड्यांना मान्यता देण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे मूल्यांकनाच्या सुधारित निकषानुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाने कालबद्ध कार्यक्रमांची घोषणा नुकतीच केली. राज्य शासनाने खासगी कायम विनाअनुदानित तत्त्वावरील प्राथमिक शाळा व वर्ग तुकड्यांना मान्यता दिली होती. पुढे या शाळांच्या मागणीनुसार त्यांचा "कायम' शब्द काढून टाकण्यात आला. गतवर्षी या विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार राज्यातील विनाअनुदानित तत्त्वावरील शाळांना, तसेच वर्ग तुकड्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. यासाठी त्रिस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली असून जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय समित्यांकडून अनुदान पात्र शाळा ठरविण्यात येणार आहेतत्यासाठीच्या मूल्यांकनाचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला.

अनुदानासाठी इच्छुकांनी 15 नोव्हेंबर 2011 16 जुलै 2013 मधील शासन निर्णयानुसार निर्धारित निकषाच्या आधारे स्वतःचे मूल्यमापन करायचे आहे. शिक्षण संचालकांचे आवाहन "ऑनलाइन माहिती भरण्यापूर्वी संकेतस्थळावरून फॉर्मची प्रत काढून प्रथम पेनाने भरावी. ऑनलाइन स्वयंमूल्यांकन प्रस्ताव सादर करण्यास तांत्रिक अडचणी आल्यास संचालनालयातील यादवेंद्र जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राथमिकचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी केले आहे.

औरंगाबाद विभागातील विनाअनुदानित शाळा
औरंगाबाद - 828
जालना - 260
बीड - 325
परभणी - 449
हिंगोली - 118
-------------
एकूण - 1980