नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

एमपीएससी (MPSC) परीक्षा २०१४ - वेळापत्रक जाहीर...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१४ मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. या सर्व परीक्षांचे अभ्यासक्रम व जुन्या प्रश्नपत्रिका www.mpsc.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.


१) राज्यसेवा परीक्षा
राज्य सरकारच्या सेवेतील राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील विविध पदे या परीक्षेद्वारे भरण्यात येतात. यात उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक/ सहायक पोलिस आयुक्त, तहसिलदार, विक्रीकर अधिकारी, उपनिबंधक सहकारी संस्था, गटविकास अधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद मुख्याधिकारी, कक्ष अधिकारी इ. १९ पदांसाठी निवड केली जाते.

जाहिरात प्रकाशित/ अर्ज भरणे - डिसेंबर २०१३
पूर्व परीक्षा - २ फेब्रुवारी २०१४
मुख्य परीक्षा - ३०, ३१मे व १ जून २०१४

२) पोलिस उपनिरीक्षक परीक्षा
ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक व मुलाखत या टप्प्यांतून होते.

जाहिरात प्रकाशित/ अर्ज भरणे - फेब्रुवारी २०१४
पूर्व परीक्षा - ६ एप्रिल २०१४
मुख्य परीक्षा - २७ जुलै २०१४

३) विक्रीकर निरीक्षक परीक्षा
राज्य सरकारच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत म्हणजे विक्रीकर. विक्रीकराची वसुली, व्यवस्थापन इत्यादींसाठी विक्रीकर निरीक्षकांची भूमिका मह्त्त्वाची असते.

जाहिरात प्रकाशित/ अर्ज भरणे - मे २०१४
पूर्व परीक्षा - १३ जुलै २०१४
मुख्य परीक्षा - २३ नोव्हेंबर २०१४

४) सहायक परीक्षा
मुंबईतील मंत्रालयातील विविध विभाग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात सहायकांची नियुक्ती होते.

जाहिरात प्रकाशित/ अर्ज भरणे - एप्रिल २०१४
पूर्व परीक्षा - १५ जून २०१४
मुख्य परीक्षा - २१ सप्टेंबर २०१४

५) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
राज्य सरकारच्या वनसेवेतील राजपत्रित, गट - अ व गट - ब ची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र वन सेवा परीक्षा घेण्यात येते. जंगलाची मालकी, व्यवस्थापन, संवर्धन हे सरकारकडे असते. त्यामुळे फॉरेस्ट्रीमध्ये करिअर करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण आहे.
पदे ः १) सहायक वनसंरक्षक
 ( असिस्टंट कॉन्झर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट) - ( गट - अ)
२) वनक्षेत्रपाल
 (रेंज फॉरेस्ट ऑफिसर) - ( गट - ब)

जाहिरात प्रकाशित / अर्ज भरणे - नोव्हेंबर २०१३
पूर्व परीक्षा - २७ एप्रिल २०१४
मुख्य परीक्षा - २७-२८ सप्टेंबर २०१४

६) लिपिक - टंकलेखक परीक्षा
मंत्रालयीन विभाग व मुंबईतील राज्य सरकारच्या विविध कार्यालयातील लिपिक-टंकलेखक(मराठी) व लिपिक-टंकलेखक(इंग्रजी) या गट - क संवर्गातील भरतीसाठी ही परीक्षा आहे. (लिपिक - टंकलेखक (मराठी) पदासाठी मराठी टंकलेखनाचा (टायपिंग) वेग ३० शब्द प्रति मिनिट तर लिपिक - टंकलेखक(इंग्रजी) पदासाठी इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० शब्द प्रति मिनिट हवा. या वेगाबाबतची शासकीय परीक्षा मंडळाची टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.)

जाहिरात प्रकाशित/ अर्ज भरणे - मार्च २०१४
लेखी परीक्षा - १८ मे २०१४