नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

पोस्टात 1,349 जागा रिक्त; जानेवारीपर्यंत होणार भरती
पोस्टात 1,349 जागा रिक्त; जानेवारीपर्यंत होणार भरती
पुणे - राज्यातील पोस्ट कार्यालयांत रिक्त असणार्‍या 1,349 जागा जानेवारी 2014 पर्यंत भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्र व गोवा सर्कलमध्ये पोस्टल असिस्टंटच्या 193, पोस्टमनच्या 665 व मल्टिटास्किंग स्टाफ (ग्रुप डी)च्या 471 जागा रिक्त असल्याचे मुख्य पोस्टमास्टर कर्नल के. सी. मिश्रा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

देशातील 120 पोस्ट ऑफिसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कोअर बँकिंग सुरू करण्याचे निश्चित झाले आहे. त्यापैकी महाराष्ट्र सर्कलमध्ये   सहा ठिकाणी बॅँकिंग सुविधा सुरू केली जाणार आहे. यामध्ये पुणे, पंढरपूर, सातारा, फलटण व पणजीचा समावेश आहे. पोस्ट ऑफिसच्या   माध्यमातून राज्यातील एक हजार  ठिकाणी मार्च 2014 पूर्वी एटीएम सेंटर सुरू करण्याचीही योजना आहे.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना (मनरेगा)चे 1800 कोटी रुपयांचे वाटप पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आतापर्यंत करण्यात आले आहे. शासनाची बॅँकापेक्षा पोस्ट कार्यालयावर अधिक विश्वासार्हता असून पुढील काळात सर्व शासकीय योजना पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून राबवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

राज्यस्तरीय निबंध स्पर्धा : पोस्ट कार्यालयामार्फत ‘भविष्य वाचवा’ योजनेअंतर्गत पृथ्वी वाचवा आणि मुली वाचवा या दोन विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. या दोन विषयांवर पोस्ट कार्यालयाने चार वयोगटात राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली असून शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. स्पर्धकांनी निबंध पूर्ण नाव, पत्ता, ई-मेल व फोन क्रमांक यासह मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, दुसरा मजला, जीपीओ भवन, मुंबई-400001 येथे पाठवण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क - एस. बी. व्यवहारे 022-22621806

दैनिक दिव्य मराठी