नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात 191 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहाय्यक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण- तांत्रिक (32 जागा), प्राचार्य व उपप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय/केंद्र निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार-तांत्रिक (71 जागा), प्राचार्य व उपप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक/ अभियांत्रिकी अधीक्षक, टेक्निकल हायस्कूल/केंद्र (88 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2013 आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in वwww.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.