सचिनला ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झालाय.
सचिन तेंडुलकरला भारतरत्न देणं ही खुद्द सचिन तेंडुलकर प्रमाणंच
त्याच्या चाहत्यांसाठीही एक "सरप्राईज गिफ्ट"
आहे.
गेली जवळपास अडीच दशके भारतासह जगातील कोट्यवधी क्रिकेट रसिकांना आपल्या खेळाने परमानंद देणारा...

क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला भारत सरकारने 'न
भूतो, न भविष्यती' असा 'सेंड ऑफ' दिला आहे.
निवृत्तीनंतरही विक्रम !
क्रिकेटच्या मैदानावरील जिवंत आख्यायिका ठरलेला सचिन जेव्हा-जेव्हा मैदानात उतरायचा, तेव्हा त्याच्या खात्यावर नवा विक्रम लिहिला जायचा. विक्रमाची ही परंपरा त्याच्या निवृत्तीनंतरही थांबली नाही. सर्वात कमी वयात आणि पहिला 'भारतरत्न' खेळाडू होण्याचा बहुमान पटकावत त्याने ही परंपरा कायम राखली आहे.
सचिन व त्याच्या अगणित चाहत्यांचे या निमित्य खूप खूप अभिनंदन !
...........सचिन आम्ही तुला कधीही विसरणार नाही !
नरेंद्र मोदी : सचिनने क्रीडा क्षेत्राला दिलेल्या योगदानाला "भारतरत्न' हा सलाम आहे. माझ्या त्याला शुभेच्छा.
लता मंगेशकर : नमस्कार. सचिनला भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याचे मला आताच कळाले. याचा मला खूप आनंद असून अभिमान वाटतो. मला खात्री वाटते की सर्व क्रिकेटप्रेमींना माझ्याप्रमाणेच आनंद झाला असेल.

मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला विजयी निरोप दिल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि शिखर धवन यांनी त्याला खांद्यावर उचलून घेतले.