भारतीय हवाईदलामधील हवामान विभागात ग्राऊंड डयुटी विभागात पर्मनंट कमिशन तसेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये अधिकारीपदासाठी भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता - विज्ञान शाखेतून पदव्युत्तर शिक्षण ( एम . एस्सी ) असणे आवश्यक ( किमान ५० टक्के गुण हवेत ) तसेच पदवीस्तरावर भौतिकशास्त्र व गणित विषयात किमान ५५ टक्के गुण मिळवले असले पाहिजेत .
वयोमर्यादा - २० ते २५ वर्षे
प्रवेश अर्ज - विहीत नमुन्यात अर्ज करून तो पोस्टाने, जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
प्रवेश अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट आहे.
निवडप्रक्रिया - प्रवेश अर्जामधून शैक्षणिक गुणवत्तेवर विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केले जाते . पुढे या विद्यार्थ्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीला बोलाविले जाते. निवड झालेल्या उमेदवारांना ५२ आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाते. हवामान विभागातील अधिकाऱ्यांना सुरुवातीचा अंदाजे मासिक पगार ( सर्व भत्ते धरून ) रू. ५५ हजार इतका असतो .
महिलांनादेखील हवामान विभागात अधिकारी म्हणून प्रवेश.
.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती
याविषयी माहितीसाठी
"Like" करा