नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
मागोवा - 24 सप्टेंबर 2012 ते 30 सप्टेंबर 2012
- माजी विधानसभा अध्यक्ष श्री कृष्णराव रखमाजीराव देसाई उर्फ बाबासाहेब कुपेकर
यांचे निधन .
- कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील कानडेवाडी या गावाच्या सरपंच
पदावरून राजकीय कारर्किदीची सुरुवात .
- कोल्हापूर जि. प. वर काम पाहीले .
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार .
- गडहिंग्लज मतदारसंघातून .
- 2005 साली विधानसभा अध्यक्ष.
- राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणूनही काम पाहीले .
.
- प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय सूरकर यांचे निधन .
- चित्रपट: चौकट राजा , आनंदाचं झाड , सातच्या आत घरात , तू तिथं मी
.
' सुखान्त ' हा त्यांचा चित्रपट इच्छामरणाचा विषय हाताळणारा होता .
- मालीका: अवंतिका , सुकन्या . .
- हैदराबाद मुक्ती संग्रामातील अग्रणी , थोर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ताराबाई
परांजपे यांचे निधन .
- उपमुख्यमंत्रीपदाचा अजित पवार यांचा राजीनामा .
अजित पवार यांनी वित्त व
नियोजन मंत्री आणि ऊर्जामंत्री पदाचाही राजीनामा दिला .
- भारताच्या 39 व्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती अल्तमश कबीर यांची नियुक्ती .
- या पूर्वी झारखंड आणि कोलकता या उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्तीपद त्यांनी
भूषविले .
- न्यायमूर्ती एस. एच. कपाडिया सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून
निवृत्त झाले त्या जागी कबीर यांची नियुक्ती करण्यात आली .
- 27 सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन .
- विद्यमान केंद्रीय रेल्वेमंत्री: सी. पी. जोशी
- केंद्रीय अर्थमंत्री: पी. चिदंबरम
- मुंबई महानगरपालिका स्वतः 20 MW क्षमतेचा विद्युतनिर्मीती प्रकल्प उभा करणार
आहे . मोरबे धरणाच्या 100 एकर जमीनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे .
- केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग ( CBI ) 1993 पासूनच्या कोळसा खाण वाटपाची चौकशी
करणार.
- राज्यात 4 हजार 637 ग्रामपंचायतीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार.
- भारताचा आजतागायताचा सर्वात जास्त ( 3 हजार 400 किलो ) वजनाच्या GSAT - 10 ह्या
उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण .
- ' गगन ' साठी हा उपग्रह उपयुक्त असेल . शिवाय - प्रगत दळणवळणासाठी उपयोगी
- दक्षिण अमेरिकेतील ' फ्रेंच गियाना ' इथल्या युरोपीय प्रक्षेपण तळावरून तो
प्रक्षेपित करण्यात आला .
राष्ट्रीय व्यवस्थापन परिषद मुंबईत संपन्न.
चोवीसावे ' अखिल भारतीय मराठी बालकुमार साहीत्य संमेलन ' डिसेंबर 2012 मध्ये
रत्नागिरी जिल्ह्यातील ओणी ता. राजापूर येथे होणार आहे .
संयुक्त राष्ट्र संघटनेचे ' जैवविविधता ' ( Biodiversity ) ह्या विषयावरील
जागतिक परिसंवाद हैदराबादेत संपन्न .
- केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री :जयंती नटराजन
राज्यात 2 ऑक्टोबर 2012 ते 31 ऑक्टोबर 2012 या कालवधीत ' महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जागृती अभियान ' राबविले जाणार .
- स्वयंपूर्ण ग्राम राज्याची उभारणी हा महात्मा गांधीचा संकल्प होता . त्या
दृष्टीने हे अभियान राबविले जाणार आहे .
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी संदीप पाटील यांची
नियुक्ती .
सत्ताविसावा ' इंदीरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ' कवी गुलजार यांना
जाहीर . 31 ऑक्टोबरला म्हणजे इंदीरा गांधींच्या स्मृतीदिनी तो त्यांना प्रदान केला
जाईल