नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

वर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा !


सुचना
तुम्हाला ज्या दिवशीचे वय मोजायचे आहे ती तारीख पहिला ओळीतील बॉक्स मध्ये टाका.
नंतर त्याखालील बॉक्स मध्ये तुमची जन्मतारीख टाका व ‘गो’ वर क्लिक करा.
तुमचे वय वर्ष, महिने, दिवस, तास अन मिनिटांमध्ये खालील बॉक्स मध्ये दिसतील.
आवडले असेल तर Like करायला मात्र विसरू नका.


नोकरभरतीचा अर्ज करतांना वय किती आहे हे मोजतांना अनेकांची अडचण होते. 
अर्जात नमुद असलेल्या तारखेला वर्ष, महिने व दिवसांमध्ये वय किती आहे 
हे मोजण्यासाठी एक सोप्पी सुविधा आमच्या वाचकांसाठी देत आहोत. 
नक्कीच त्याचा आपल्याला उपयोग होईल.

हि पोस्ट शेअर करून जास्तीत जास्त मित्रांना कळवा !

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळात मोठी भरती

महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळात मोठी भरती
महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ आस्थापनेवरील वरिष्ठ लेखापाल,कनिष्ठ अभियंता ,लघुलेखक (उच्च व निम्न श्रेणी ),लघु टंकलेखक ,लिपिक टंकलेखक ,गाळणी निरीक्षक ,तांत्रिक सहाय्यक ,अनुरेखक ,जोडारी ,भूमापक ,वाहन चालक ,शिपाई पदे भरण्याकरिता ,पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जानेवारी २०१२ आहे.

अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषदेत 22 जागांसाठी भरती

नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषदेत 22 जागांसाठी भरती
नाशिक जिल्हा नगरपरिषदेच्या आस्थापनेवर महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- स्थापत्य (6 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा –विद्युत (4 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-संगणक (5 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय,मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा (10 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद लेखा व लेखा परिक्षण सेवा- (12 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा (3 जागा) ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी 2013 आहे.

अधिक माहिती http://www.nashikexam.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कृषि आयुक्तालयाअंतर्गत आत्मा योजनेत 25 जागा

कृषि आयुक्तालयाअंतर्गत आत्मा योजनेत 25 जागा
राज्याच्या कृषि आयुक्तालयाअंतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील आत्मा योजनेत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (4 जागा), विषय विशेषज्ञ (20 जागा), संगणक आज्ञावली रुपरेषक (1 जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची मुदत 29 डिसेंबर 2012 आहे.

अधिक माहिती http://maharojgar.gov.in/GovtAdvt/Govt_4124.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात १७३ जागा

मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात १७३ जागा
मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात स्थापत्य कनिष्ट अभियंता (गट ब)-८४, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट क )-४०, वरिष्ठ लिपिक-१७, कनिष्ठ लिपिक-२८, संगणक (गट क ) - ४ पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जानेवारी २०१३ आहे.

अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ३१९६ लिपिकांची भरती

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ३१९६ लिपिकांची भरती
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ३१९६ लिपिकांची पदे भरण्याकरिता जाहिरात प्रकाशित झाली असून पात्र उमेदवारांकडून ७ जानेवारी २०१२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिक माहिती https://www.centralbankofindia.co.in/site/MainSite.aspx?status=1&menu_id=17 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दि अमरावती जिल्हा सहकारी बँकेत १०० लिपिकांची भरती

दि अमरावती जिल्हा सहकारी बँकेत १०० लिपिकांची भरती
दि अमरावती जिल्हा सहकारी बँक मर्यादीत अमरावती मध्ये १०० लिपिकांची पदे भरण्याकरिता निवड सूची तयार करण्यासाठी सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ३१ जानेवारी २०१२ पर्यंत एम.के.सी.एल. मार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सुमारे २२००० केंद्रीय पोलिसांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सुमारे २२००० केंद्रीय पोलिसांची भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत Constable (GD) in CAPF & Rifleman in Assam Rifles या पदाकरिता बावीस हजार जागासाठी जाहिरात प्रकाशित झाली असून सदरील अर्ज १५ डिसेंबर २०१२ ते ११ जानेवारी २०१३ या काळात ऑन लाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती http://nmk.co.in/Upload/NMKJID377.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात विविध पदांसाठी थेट मुलाखती

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात महिला नाईट वॉर्डन, संगणक चालक, सुतार, गवंडी, पंप ऑपरेटर, तारतंत्री, नळ कारागिर, कुली, शिपाई ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत.

या पदांसाठी थेट मुलाखती दि. 19 डिसेंबर 2012 आहे.
यासंबंधीची सविस्तर माहिती http://maharojgar.gov.in/GovtAdvt/Govt_4113.pdf या संगणकावर उपलब्ध आहे.

पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये 8 जागांसाठी थेट मुलाखती

पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये तांत्रिक अधिकारी-इलेक्ट्रिकल (1 जागा), तांत्रिक सहायक (1 जागा), तंत्रज्ञ (2 जागा), वरिष्ठस्तर लिपिक (1 जागा), वरिष्ठ संशोधन फेलो (1 जागा), तांत्रिक अधिकारी-अभियांत्रिकी (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.

या पदांसाठी थेट मुलाखती दि. 18 डिसेंबर 2012 रोजी होणार आहेत.
अधिक माहिती http://icmr.nic.in/icmrnews/ADVERTISEMENT%20-SCALING.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कृषि आयुक्तालयाअंतर्गत आत्मा योजनेत 25 जागा

राज्याच्या कृषि आयुक्तालयाअंतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील आत्मा योजनेत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (4 जागा), विषय विशेषज्ञ (20 जागा), संगणक आज्ञावली रुपरेषक (1 जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत.

या पदासाठी अर्ज करण्याची मुदत 29 डिसेंबर 2012 आहे.
यासंबंधीची सविस्तर माहिती http://maharojgar.gov.in/GovtAdvt/Govt_4124.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

रत्नागिरी जिल्हा नगरपरिषदेत 22 जागांसाठी भरती

रत्नागिरी जिल्हा नगरपरिषदेच्या आस्थापनेवर महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-स्थापत्य (6 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- विद्युत (2 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- संगणक (2 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय,मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा (6 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद लेखा व लेखा परिक्षण सेवा (6 जागा) ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2012 आहे.
अधिक माहिती www.ratnagiri.gov.in व https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

MPSC States Services Examination New Dates


सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई


२ रा मजला, बांधकाम भवन, २५, मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई

जळगाव जिल्हा निवड समिती

जळगाव जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील नगरपरिषदांमध्ये महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-स्थापत्य (13 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- विद्युत (11 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- संगणक (11 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय,मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा (17 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद लेखा व लेखा परिक्षण सेवा (15 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा (8 जागा) ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2012 आहे.
सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 5 डिसेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती www.jalgaon.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

Social Welfare Officer- Gr-B Syllabus

MPSC द्वारा घेतल्या जाणाऱ्या 20 जानेवारी 2013 च्या नियोजित परीक्षाचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.



महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार
महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा केला जाणारा हा सन्मान आहे. (ह्याच नावाने इतरही काही संस्था/ वृत्तपत्रे पुरस्कार देतात पण खालील माहिती केवळ महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणार्‍या पुरस्काराशी संबंधित आहे.)
पुरस्काराचे स्वरूप: 5 लाख रुपये रोख , सन्मान पत्र आणि मानचिन्ह
हा पुरस्कार शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकाळात सुरु झाला.
पहिला पुरस्कार महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांना बहाल केला होता.



वर्ष सन्मानार्थी व्यक्ती इतर माहिती
2011 अनिल काकोडकर
क्षेत्र: विज्ञान
  • भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र (बीएआरसी)चे माजी संचालक
  • अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि अणुउर्जा खात्याचे माजी सचिव
2010 जयंत नारळीकर
क्षेत्र:विज्ञान
  • मराठी खगोलशास्त्रज्ञ व लेखक
  • डॉ. फ्रेड हॉयले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी स्थिरस्थिती विश्र्वाचा सिद्धांत मांडला.
  • मराठी विज्ञानकथेचे प्रणेते.
  • खगोल-भौतिकी संशोधन केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘आयुका’ (Inter-University Center for Astronomy and Astrophysics) ही संस्था त्यांनी पुण्यात स्थापन केली.
2009 सुलोचना लाटकर
क्षेत्र: कला, सिनेमा
  • हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलावंत श्रीमती सुलोचना लाटकर अर्थात सुलोचना दिदी.
  • 250 हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटातून काम.
2008 मंगेश पाडगावकर
क्षेत्र:साहित्य
  • ख्यातनाम मराठी कवी
  • 'सलाम' या कवितासंग्रहासाठी यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार
2008 नानासाहेब धर्माधिकारी
क्षेत्र: समाज सेवा
  • नारायण विष्णु धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते.
  • त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत कार्य केले.
2007 रा. कृ. पाटील क्षेत्र:लोक प्रशासन
  • गांधावादी.
  • स्वातंत्रपूर्व ICS सेवे द्वारे नागरी सेवा क्षेत्रात प्रवेश.
  • 'नागपूर कराराचा ' मसुदा तयार केला.
  • भारताच्या पहिल्या नियोजन आयोगाचे (Planning Commission) सदस्य होते.
2006 रतन टाटा
क्षेत्र:उद्योग
  • टाटा समूह ह्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे चेअरमन
2005 रघुनाथ अनंत माशेलकर
क्षेत्र:विज्ञान
  • भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे महत्कार्य.
  • पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटोरी - एन.सी.एल. (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा)चे माजी संचालक
  • सेंटर फॉर सायंटिफीक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (CSIR) चे माजी महासंचालक.
  • बौद्धिक ज्ञानसंपादनाच्या हक्काविषयीचे (पेटंट) धोरण याबाबत त्यांचे योगदान मोठे आहे.
2004 बाबा आमटे
क्षेत्र:समाज सेवा
  • स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्र्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली.
  • भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला.
  • १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते.
2003 डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग
क्षेत्र: समाजसेवा व आरोग्यसेवा
  • सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात.
2002 भीमसेन जोशी
क्षेत्र: कला,संगीत
  • भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक
2001 सचिन तेंडुलकर
क्षेत्र: क्रीडा
  • क्रिकेटचा देव मानला जाणारा हा महान खेळाडू सध्या राज्यसभेचा सदस्यही आहे.
1999 विजय भटकर
क्षेत्र:विज्ञान
  • सी-डॅकचे संस्थापक व पहिले कार्यकारी संचालक
  • परम कार्यक्रम व लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलचे मदतनीस आणि सल्लागार
1997 लता मंगेशकर
क्षेत्र: कला,संगीत
  • भारताच्या महान गायिका
1996 पु. ल. देशपांडे
क्षेत्र: साहित्य
  • लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक 

Weekly Current Affairs - 3 Dec 2012 to 9 Dec 2012


आंतरराष्ट्रीय

  • फिलीपाइन्समध्ये आलेल्या बोफा वादळातील बळींची संख्या ४७५ वर गेली असून, दोन लाखांहून अधिक नागरिकांना या भीषण वादळाचा फटका बसला आहे
  • एलजी, फिलिप्स, पॅनॉसॉनिक,तोशिबा कॉर्प,सॅमसंग आणि टेक्निकलर ह्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील सहा दिग्गज कंपन्यांना युरोपीय आयोगाने तब्बल 10,500 कोटी रुपयांचा (1.47 अब्ज युरो) आर्थिक दंड ठोठावला आहे. या कंपन्यांनी संगनमत करून कॅथोड-रे ट्यूब्जच्या किमती वाढवल्याचे सिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
  • नारळाचा स्वाद असलेली अननसाची जगातील पहिली प्रजात ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी तयार केली.
  • संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद कतारमधील दोहा येथे संपन्न.
  • क्योटो प्रोटोकॉलच्या पहिल्या टप्प्याची मुदत 31 डिसेंबर 2012 रोजी संपणार आहे. दुस-या टप्प्याबाबत अजूनही एकमत होऊ शकलेले नाही.
  • मालदीव सरकारने येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरणाचा प्रकल्प भारतीय कंपनीकडून (GMR) काढून घेतल्यामुळे भारत सरकारने मालदीवला दिली जाणारी आर्थिक मदत थांबविली आहे.

राष्ट्रीय

  • उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारने पूर्व उत्तर प्रदेशात कुशीनगर येथे भगवान गौतम बुद्धांची जगातील सर्वात उंच मूर्ती स्थापन करण्याच्या योजनेला हिरवा कंदील दर्शवला आहे. कुशीनगर येथे बुद्धमूर्ती स्थापन केली जाणार असून त्यावर जवळपास 1500 कोटी रुपये खर्च येईल,कुशीनगर हे भगवान बुद्धांचे निर्वाणस्थळ आहे
  • केंद्र सरकारने इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी हस्तांतरित करण्याचे संसदेत जाहीर केले.
  • केंद्र सरकारच्या २९ कल्याणकारी योजनांतर्गत अनुदानित रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँकखात्यात जमा करण्याच्या रोख हस्तांतर (डायरेक्ट कॅश ट्रान्सफर) योजनेची घोषणा गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांच्या काळात करणे चुकीचे होते, असा ठपका केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारवर ठेवला आहे. ही घोषणा आचारसंहितेच्या वातावरणास बाधक असल्याचे सांगत या योजनेची गुजरात आणि हिमाचलमध्ये अंमलबजावणी करू नका, असे आदेशही आयोगाने सरकारला दिले
  • कर्नाटकाचे माजी मुख्‍यमंत्री बी एस येडियुरप्‍पांनी केली कर्नाटक जनता पक्षाची स्‍थापना
  • अयोध्येमध्ये बाबरी मशिद पाडल्याला घटनेला २० वर्ष पूर्ण.



प्रादेशिक

  • महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी पुन्हा अजित पवार
    अजित पवार यांनी २५ सप्टेंबरला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
  • कोकणातील सहकार क्षेत्रामध्ये गेली सुमारे तेवीस वष्रे पारदर्शी कारभार करीत स्पृहणीय कामगिरी केलेल्या स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला राज्य शासनातर्फे 'सहकार भूषण' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
  • मराठी साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कारासाठी ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता ('झिम्मा' आत्मकथा), यशवंतराव गडाख ('अंतर्वेध' व्यक्तिचित्रण) व डॉ. महेंद्र कदम ('आगळ' कादंबरी) यांच्या साहित्यकृतींची निवड झाली आहे
  • भारतीय भाषा क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधन कार्याबद्दल येथील खांडबहाले डॉटकॉम या संकेत स्थळाचा 'युनायटेड नेशन्स वर्ल्ड समित ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी'कडून आंतरराष्ट्रीय 'मंथन' पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. दक्षिण आशिया खंडात प्रादेशिक भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणाऱ्या उपक्रमांकरिता हा पुरस्कार दिला जातो.

  • व्यावसायिक रंगभूमीवर वैशिष्टय़पूर्ण नाटय़मुद्रेचा ठसा उमविणारे ज्येष्ठ संगीत रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांना यंदाचा संगीताचार्य बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे
  • ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांना यंदाचा 'गदिमा' पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • मराठी साहित्य आणि रंगभूमीवरील बहुआयामी व्यक्तिमत्त्व कै. पु. ल. देशपांडे यांच्या योगदानाच्या स्मृती जागवणारा 'पुलोत्सव' हा बहुरंगी कार्यक्रम येत्या ७ डिसेंबरपासून रत्नागिरी येथे , यंदा त्यामध्ये बुजुर्ग रंगकर्मी विजया मेहता यांना 'पुलोत्सव सन्मान' पुरस्कार.
  • राज्यातील सर्व शाळांना आता मूलभूत सुविधांपासून शिक्षकांपर्यंत सर्व सुविधा देणे बंधनकारक ठरले असून, या सुविधा आहेत किंवा नाही हे तपासून दर तीन वर्षांनी शाळांना मान्यता घ्यावी लागणार आहे. सुविधा न देणार्‍या शाळांना द्रव्य दंडापासून मान्यता रद्द पर्यंतच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.


परिघा पलीकडचे

  • शेतकऱ्याचं आयुष्य आणि ग्रामीण भागातील आरक्षणाचं वास्तव चित्रित करणाऱ्या लेखक आसाराम लोमटे यांच्या 'बेईमान' कथेवर 'सरपंच भगीरथ' हा चित्रपट होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे करणार आहेत.
  • फेसबुकने अँड्रॉइड फोनसाठी नवीन संदेश उपयोजन (न्यू मेसेंजर अ‍ॅप) सुरू केले असून, त्याच्या मदतीने फेसबुक खाते नसलेल्यांसह सर्वजण एकमेकांना फोनवरून संदेश पाठवू शकतील व ग्रहण करू शकतील.
  • एसएमएस म्हणजेच लघुसंदेश सुविधेला ३ डिसेंबरला वीस वर्षे पूर्ण