नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

एम.पी.एस.सी.लिपीक टंकलेखक परिक्षा २ जुनला होणार (Download Hall Ticket)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लिपिक टंकलेखक (मराठी/इंग्रजी) ही परिक्षा २ जुन २०१३ रोजी विवीध केंद्रांवर होणार आहे. या परिक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. ज्या उमेदवारांनी केंद्र पडताळणी केली नसेल त्यांनी ती करून हॉलतिकीट डाऊनलोड करावे.


Visit For More Information  http://www.mpsconline.gov.in/

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर शिपाई/हमालाच्या 194 जागा

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर शिपाई/हमाल (194 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 7 जून 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 20 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात शिपाई पदाच्या 4 जागा

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात सरळसेवेद्वारे शिपाई (4 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात http://mahafood.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


नॅशनल इन्श्युरंस कंपनी मध्ये सहाय्यक पदाच्या २६०० जागा

नॅशनल इन्श्युरंस कंपनी मध्ये पदवी किंवा ६०% पेक्षा जास्त मार्क घेऊन एच.एस.सी. HSC (किंवा समकक्ष परिक्षा) पास झालेल्या उमेदवारांसाठी सहाय्यक पदाच्या २६०० जागा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ जून २०१३ 
१४ जुलै २०१३ ते २१ जुलै २०१३ दरम्यान लेखी परीक्षा
अधिक माहितीकरीता भेट द्या  http://www.nationalinsuranceindia.com



MPSC, UPSC व स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त माहीती

युपीएससी-एमपीएससी परीक्षांसाठी अनेक
पुस्तकं उपलब्ध आहेत. जाडजूड, मोठाली, सविस्तर
माहिती देणारी ही पुस्तकं असतात. पण
त्यांचा अभ्यास करताना काही गोष्टी डोक्यात
ठेवल्या पाहिजेत.

स्पर्धा परीक्षांवर पुष्कळ माहिती उपलब्ध
आहे. वेबसाइट्स, पुस्तकं, मासिकं, सीडीज
यांसारख्या अनेक माध्यमांतून माहिती मिळत
असते. पण माहितीचे जेवढे स्रोत जास्त असतात
तेवढीच कन्फ्युजन होण्याची शक्यताही जास्त
असते. त्यामुळे सगळी पुस्तकं
थोडी थोडी वाचण्यापेक्षा एकच पुस्तक
खूपदा वाचा. कारण पुस्तक कुठलंही असो पहिलं
महायुद्ध सगळीकडेच एकसारखं असणार आहे.

एखाद्या विषयावर सविस्तर
माहिती पुस्तकात असते. समजा १२० पानं
त्या विषयाच्या धड्यावर असतील तर
त्यातली मोजकीच ४०-४५ पानं लक्षपूर्वक
वाचावीत. महत्त्वाच्या मुद्यांवर खूण करून
ठेवावी. एकदा दोनदा नव्हे तर डोक्यात पक्कं
होईपर्यंत वाचा. पण कृपया घोकंपट्टी करू नका.

मुद्दे वाचून झाल्यावर शांत डोक्याने विचार
करावा. स्वत:च स्वत:शी त्या मुद्यांवर चर्चा करावी.
एखादी घटना घडली नसती किंवा दुसऱ्या पद्धत
घडली असती तर त्याचे परिणाम काय झाले
असते? यासारखे प्रश्न स्वत:लाच विचारावेत.
मात्र असं करत असताना त्या विषयाशीच
चिकटून रहावं.

विचारविनिमय सुरू असतानाच दुसरीकडे
नोट्स काढाव्यात. 
नोट्स लिहिणं म्हणजे
पुस्तकातलं जसंच्या तसं लिहिणं नाही.
त्या विषयाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहून
काढावा. संपूर्ण नोट्स लिहून झाल्यावर
पुन्हा एकदा वाचाव्यात. त्यामुळे रिविजन
करताना पुन्हा पुस्तक
वाचण्यापेक्षा त्या नोट्सवरून नजर फिरवणं
सोयीस्कर जातं.

इतर काही मुद्दे
या परीक्षांची १२ वी नंतर तयारी सुरु
केल्यास उत्तम.

पदवीनंतरही तयारी होऊ शकते

स्वत: अभ्यास करण्याबरोबरच योग्य
मार्गदर्शक निवडा. कारण मार्गदर्शनाशिवाय
ट्रॅक चुकण्याची शक्यता असते.

परीक्षा देण्याच्या एक ते दीड वर्ष
आधी अभ्यास सुरू करा.

आधी मेन्स मग प्रिलीम अशा क्रमाने अभ्यास करा.

प्रिलिमच्या परीक्षेसाठी अभ्यास करण्यास
९० दिवस पुरेसे आहेत.

विषय निवडताना विषयाची आवड, गोडी,
उपलब्ध साहित्य आणि मार्गदर्शन लक्षात
घ्यावं.
अभ्यासासाठी विविध विषयांची पुस्तकं,
नियमित वृत्तपत्रं वाचावीत आणि त्यावर
डिस्कशन करावीत.

१० वर्षांपासूनचे पेपर बघावेत. जेणेकरून
परीक्षेचा अंदाज येतो.
गाइड, मासिकं - क्रोनिकल, विझार्ड, सीएसआर,
दर्पण, स्पर्धा परीक्षा , चाणक्य मंडळ,
लोकराज्य

पुस्तकं - के सागर, दत्ता सांगलोकर, दांडेकर
आदींची पुस्तकं

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान


दहा जिल्ह्यात जिल्हास्तरावर 
जिल्हा अभियान व्यवस्थापक (10 जागा), 
जिल्हा व्यवस्थापक-उपजीविका/कृषी (10 जागा), 
जिल्हा व्यवस्थापक-उपजीविका/ बिगर कृषी (10 जागा), 
जिल्हा व्यवस्थापक- क्षमता बांधणी (10 जागा), 
जिल्हा व्यवस्थापक- सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी (10 जागा), 
जिल्हा व्यवस्थापक - संनियंत्रण व मुल्यांकन (10 जागा), 
जिल्हा व्यवस्थापक- माहिती व्यवस्थापन प्रणाली (10 जागा), 
जिल्हा व्यवस्थापक- आर्थिक समावेशन (10 जागा), 
जिल्हा व्यवस्थापक-ज्ञान व्यवस्थापन (10 जागा),
जिल्हा व्यवस्थापक- विपणन (10 जागा), 
जिल्हा व्यवस्थापक-रोजगार व कौशल्य विकास (10 जागा),
कार्यालय अधीक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक- संपादणूक (10 जागा) 
तालुका स्तरावर तालुका अभियान व्यवस्थापक (30 जागा), 
तालुका व्यवस्थापक - उपजीविका (30 जागा), 
तालुका व्यवस्थापक - क्षमता बांधणी (30 जागा), 
तालुका व्यवस्थापक - सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी (30 जागा), 
तालुका व्यवस्थापक - माहिती व्यवस्थापन प्रणाली व संनियंत्रण व मुल्यांकन (30 जागा),
तालुका व्यवस्थापक - आर्थिक समावेशन (30 जागा)
क्लस्टर कोऑर्डिनेटर (138 जागा) 

ऑनलाईन अर्ज  = अंतिम तारीख - 28 मे 2013
अधिक माहिती http://www.jobs.msrlm.org/ व https://www.maharashtra.gov.in वर उपलब्ध पाहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 438 जागा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत राज्यातील दहा जिल्ह्यात जिल्हास्तरावर जिल्हा अभियान व्यवस्थापक (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-उपजीविका/कृषी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-उपजीविका/ बिगर कृषी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- क्षमता बांधणी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक - संनियंत्रण व मुल्यांकन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- माहिती व्यवस्थापन प्रणाली (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- आर्थिक समावेशन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-ज्ञान व्यवस्थापन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- विपणन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-रोजगार व कौशल्य विकास (10 जागा), कार्यालय अधीक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक- संपादणूक (10 जागा) तसेच तालुका स्तरावर तालुका अभियान व्यवस्थापक (30 जागा), तालुका व्यवस्थापक - उपजीविका (30 जागा), तालुका व्यवस्थापक - क्षमता बांधणी (30 जागा), तालुका व्यवस्थापक - सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी (30 जागा), तालुका व्यवस्थापक - माहिती व्यवस्थापन प्रणाली व संनियंत्रण व मुल्यांकन (30 जागा), तालुका व्यवस्थापक - आर्थिक समावेशन (30 जागा) आणि क्लस्टर कोऑर्डिनेटर (138 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2013 आहे. 
अधिक माहिती http://www.jobs.msrlm.org/job व  https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये 19 जागा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये नियोजक (2 जागा), उपनियोजक (8 जागा), सहायक पणन व्यवस्थापक (1 जागा), उपलेखापाल (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत करावेत.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 14 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

बार्टी संस्थेमार्फत दक्षिण मुंबई कार्यालयात लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटरच्या 11 जागा

पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेमार्फत दक्षिण मुंबई येथील कार्यालयात लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटर (11 जागा) हे पद तात्पुरत्या करार तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. 21 मे 2013 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 14 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भंडारा जिल्हा परिषदेत ८४ जागा


भंडारा जिल्हा परिषदेत ८४ जागांसाठी भरती
Click On The Advt To See Full Size


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मे २०१३



General Insurance Corporation of India- Officers Scale I (Asst Managers) Exam Call Letter
अधिक माहिती http://gic.eadmissions.net/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेतील 284 जागांसाठी भरती

जिल्हा निवड समितीमार्फत अहमदनगर जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक लिपिक (7 जागा), कनिष्ठ सहाय्यक- लिपिक (10 जागा), लघु नि टंकलेखक (1 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लेखा (7 जागा), औषध निर्माता (11 जागा), आरोग्य सेवक पुरुष - हंगामीमधून (23 जागा), आरोग्य सेवक पुरुष (5 जागा), आरोग्य सेवक-महिला (38 जागा), विस्तार अधिका?/
री- पंचायत आणि समाजकल्याण (4 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (2 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (60 जागा), कृषि अधिकारी (4 जागा), विस्तार अधिकारी - कृषी (7 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (6 जागा), कनिष्ठ आरेखक (1 जागा), पर्यवेक्षिका (6 जागा), विस्तार अधिकारी - शिक्षण (6 जागा), परिचर (91 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मे 2013 आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळमध्ये 8 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती https://oasis.mkcl.org/zp२०१३या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


गडचिरोली जिल्हा परिषद मध्ये ९४ जागा


गडचिरोली जिल्हा परिषद आस्थापनेवर कृषी अधिकारी १ जागा, कृषी विस्तार अधिकारी १ जागा, प्रयोग शाळा तंत्रज्ञ १ जागा, औषध निर्माण अधिकारी ३ जागा, आरोग्य सेवक (महिला) २० जागा, कंत्राटी ग्रामसेवक ६ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २४ जागा, पशुधन पर्यवेक्षक ५ जागा, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) ८ जागा, लघुलेखक (उ.श्रे) १ जागा, कनिष्ठ लेखा १ जागा, परिचर २३ जागा 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०१३ आहे.


एम.पी.एस.सी.उमेदवारांसाठी महत्वाची माहीती

राज्यसेवा पूर्व परीक्षा १८ मे २०१३ रोजी; प्रवेशपत्र (Hall Tickets) उपलब्ध 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ १८ मे २०१३ रोजी घेण्यात येणार असून सदर परिक्षेचे प्रवेशपत्र आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या परिक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारानी प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत.



एम.पी.एस.सी. लिपिक- टंकलेखक (इंग्रजी व मराठी) परीक्षा २०१३ च्या उमेदवारांनी प्रोफाईल अपडेट करावी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणारी लिपिक- टंकलेखक परीक्षा (इंग्रजी व मराठी) २ जून २०१३ रोजी घेण्यात येणार आहे परंतु तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सदर परिक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपली प्रोफाईल त्वरित अपडेट करावी. मात्र निवडण्यात आलेले केंद्र बदलू नये असे आयोगाने जाहीर केले आहे.

पुणे विद्यापीठात सरळसेवेद्वारे शिक्षकेतर सेवकांच्या 63 जागा

पुणे विद्यापीठात सरळसेवेद्वारे शिक्षकेतर सेवकांची उप वित्त व लेखा अधिकारी (1 जागा), उपकुलसचिव (7 जागा), अंतर्गत हिशोब तपासणीस (1 जागा), जनसंपर्क अधिकारी (1 जागा), सहायक कुलसचिव (14 जागा), सहायक वित्त अधिकारी (1 जागा), प्रोग्रॅमर (8 जागा), आरोग्य अधिकारी (1 जागा), उप अभियंता -विद्युत (1 जागा), कर्मशाळा अधिक्षक (1 जागा), सहायक अभियंता-विद्युत (1 जागा), कक्षाधिकारी -सर्वसाधारण (20 जागा), कक्षाधिकारी-लेखा (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2013 आहे. 
अधिक माहिती  http://www.unipune.ac.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.




पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत १७ जागा

पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत अधिष्ठाता- चित्रपट-१ जागा, प्रोफेसर- ३ जागा, सहयोगी प्राध्यापक- ४ जागा, सहायक प्राध्यापक- ८ जागा, चित्रपट संशोधन अधिकारी- १ जागा. त्यासाठी अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसाच्या आत करावेत. जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३-२९ मार्च २०१३ च्या अंकात आली आहे.
अधिक माहिती http://www.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


पोलीस भरती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटचे तिन दिवस


महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती २०१३ अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी औरंगाबाद शहर दल (68 जागा), नागपूर (194 जागा), पुणे शहर (141 जागा), सोलापूर शहर (131 जागा), नाशिक शहर (27 जागा), अकोला (86 जागा), अमरावती ग्रामीण (95 जागा), अहमदनगर (124 जागा), औरंगाबाद ग्रामीण (47 जागा), कोल्हापूर ग्रामीण (121 जागा), गडचिरोली (318 जागा), गोंदिया (71 जागा), जळगाव (106 जागा), ठाणे ग्रामीण (295 जागा), धुळे (45 जागा), बीड (50 जागा), सिंधुदुर्ग (51 जागा), हिंगोली (40 जागा), उस्मानाबाद (106 जागा), चंद्रपूर (105 जागा), नांदेड (105 जागा), नागपूर ग्रामीण (85 जागा), नाशिक ग्रामीण (122 जागा), परभणी (41 जागा), बुलढाणा (73 जागा), यवतमाळ (195 जागा), रत्नागिरी (81 जागा), लातूर (56 जागा), नागपूर लोहमार्ग (37 जागा), पुणे लोहमार्ग (73 जागा), वर्धा (59 जागा), वाशिम (56 जागा), सांगली (108 जागा), सातारा (95 जागा), सोलापूर ग्रामीण (105 जागा), जालना (56 जागा), नंदूरबार (64 जागा), रायगड (40 जागा) या ठिकाणी भरती आयोजित करण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे.
अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

एम.पी.एस.सी. ची परिक्षा १८ मे रोजी



सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्वपरीक्षा आता १८ मे रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी दिली. ही परीक्षा ७ एप्रिल रोजी होणार होती. मात्र, आयोगाच्या संकेतस्थळावरील डेटा करप्ट झाल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आयोगाने विद्यार्थ्यांना आपली माहिती पुन्हा एकदा अपडेट करण्याची सूचना दिली होती. पूर्वपरीक्षेसाठी राज्यभरातून २ लाख ९८ हजार विद्यार्थी बसणार आहेत. यापैकी २ लाख ६0 हजार विद्यार्थ्यांनी आपली माहिती अपडेट केली आहे. शिल्लक ३८ हजार विद्यार्थी अजूनही www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर माहिती अपडेट करू शकतात, असेही ठाकरे यांनी सांगितले.

जिल्हा परिषद पदभरतीचे सुधारीत वेळापत्रक


ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये 
राबविण्यात येत असलेली पदभरती आता जुन महिन्यात होणार आहे. 
मात्र अर्ज भरण्याची प्रक्रीया नियोजीत वेळापत्रकानुसारच होईल.
 केवळ लेखी परिक्षा जुन महिन्यात घेण्यात येईल. 
त्याचे पदनिहाय सुधारीत वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

Click On Image To View In Full Size

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

हे "Page"




तसेच आपल्याला सुद्धा सामान्यज्ञान, व्याकरण यासह 
अभ्यासपुर्ण माहिती Post करायची असेल 

तर ती सोय आमच्या नविन Page वर दिली आहे. 

"करीयर प्लस" या नव्या Page वर तुम्ही 

स्पर्धा परिक्षेसंबंधी चर्चा करू शकता. 
त्यासाठी हे Page LIKE करायला विसरू नका. 
तसेच ईतर मित्रांनाही हा "करिअर प्लस" JOIN करायला सांगा.

"Like" करा 



जिल्हा निवड समितीमार्फत सांगली जिल्हा परिषदेतील 67 जागांसाठी भरती


जिल्हा निवड समितीमार्फत सांगली जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (5 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (1 जागा), कनिष्ठ अभियंता-यांत्रिकी (1 जागा), विस्तार अधिकारी-कृषि (7 जागा), अंगणवाडी पर्यवेक्षिका (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (3 जागा), कनिष्ठ आरेखक (4 जागा), आरोग्य सेवक-महिला (13 जागा), आरोग्य सेवक-पुरुष (6 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (11 जागा), विस्तार अधिकारी-पं. (1 जागा), कनिष्ठ सहाय्यक -लेखा (8 जागा), परिचर (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल 2013 आहे. 
अधिक माहिती http://sangli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जिल्हा परिषदेची पदभरती लांबणीवर? जुन महिन्यात होणार भरती?


महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये सध्या राबविल्या जात असलेली सरळ सेवा नोकरभरती आता जुन महिन्यात होणार असल्याची बातमी दै.लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली आहे. ऑनलाईन तसेच पोस्टाद्वारे अर्ज करण्याची प्रक्रीया सुरू झाल्याने ज्यानी अर्ज केले त्यांचे काय? अर्ज करण्यास ईच्छुक असलेल्यांनी काय करायचे असे प्रश्न निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदांतर्फे मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही. अधिक माहितीसाठी बातमी वाचा.

Click On Image To View News In Full Size




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान, 
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती याविषयी माहितीसाठी



हे "Page"



तसेच आपल्याला सुद्धा सामान्यज्ञान, व्याकरण यासह अभ्यासपुर्ण माहिती Post करायची असेल 
तर ती सोय आमच्या नविन Page वर दिली आहे.
"करीयर प्लस" या नव्या Page वर तुम्ही 

स्पर्धा परिक्षेसंबंधी चर्चा करू शकता. 

त्यासाठी हे Page LIKE करायला विसरू नका. 
तसेच ईतर मित्रांनाही "करिअर प्लस" JOIN करायला सांगा.

"Like" करा 
"Career Plus"

वर्धा जिल्हा परिषदेत १०३ पदांची भरती



जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद, वर्धा अंतर्गत कृषि अधिकारी, जोडारी, पर्यवेक्षीका, विस्तार अधिकारी (शिक्षण), औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), आरोग्य सेवक (पुरूष), ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), परिचर अशी एकुण १०३ पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ एप्रील २०१३

नागपुर जिल्हा परिषदेत विवीध पदांच्या १२२ जागा


नागपुर जिल्हा परिषदेत विवीध पदांच्या १२२ जागा


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ एप्रील २०१३


ऑनलाईन अर्जासंबंधी अधिक माहितीसाठी http://www.zpngp.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

अमरावती जिल्हा परिषदेत विवीध पदांच्या ३५ जागा



अमरावती जिल्हा परिषदेत औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक (पुरूष), आरोग्य सेवक महिला व पट्टीबंधक अशी एकुण ३५ पदे
अर्ज करण्याची अंतिम तारीख दि.७ मे २०१३ 
ऑनलाईन अर्जासंबंधी अधिक माहितीसाठी http://www.zpamravati.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.  

उस्मानाबाद जिल्हा परिषद मध्ये ९२ जागांची भरती


उस्मानाबाद जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद आस्थापनेवरील कृषी अधिकारी १ जागा, विस्तार अधिकारी (कृषी) १ जागा, औषध निर्माण अधिकारी ३ जागा, वरिष्ठ सहाय्यक लेखा ३ जागा, आरोग्य सेवक २२ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ३ जागा, कनिष्ठ लेखाधिकारी १ जागा, कनिष्ठ सहाय्यक लेखा १ जागा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) १ जागा, कनिष्ठ आरेखक २ जागा, पशुधन पर्यवेक्षक १ जागा,लघुलेखक १ जागा,लिपिक- १२ जागा, परिचर २६ जागा


अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०१३
सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना