नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

MPSC, UPSC व स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त माहीती

युपीएससी-एमपीएससी परीक्षांसाठी अनेक
पुस्तकं उपलब्ध आहेत. जाडजूड, मोठाली, सविस्तर
माहिती देणारी ही पुस्तकं असतात. पण
त्यांचा अभ्यास करताना काही गोष्टी डोक्यात
ठेवल्या पाहिजेत.

स्पर्धा परीक्षांवर पुष्कळ माहिती उपलब्ध
आहे. वेबसाइट्स, पुस्तकं, मासिकं, सीडीज
यांसारख्या अनेक माध्यमांतून माहिती मिळत
असते. पण माहितीचे जेवढे स्रोत जास्त असतात
तेवढीच कन्फ्युजन होण्याची शक्यताही जास्त
असते. त्यामुळे सगळी पुस्तकं
थोडी थोडी वाचण्यापेक्षा एकच पुस्तक
खूपदा वाचा. कारण पुस्तक कुठलंही असो पहिलं
महायुद्ध सगळीकडेच एकसारखं असणार आहे.

एखाद्या विषयावर सविस्तर
माहिती पुस्तकात असते. समजा १२० पानं
त्या विषयाच्या धड्यावर असतील तर
त्यातली मोजकीच ४०-४५ पानं लक्षपूर्वक
वाचावीत. महत्त्वाच्या मुद्यांवर खूण करून
ठेवावी. एकदा दोनदा नव्हे तर डोक्यात पक्कं
होईपर्यंत वाचा. पण कृपया घोकंपट्टी करू नका.

मुद्दे वाचून झाल्यावर शांत डोक्याने विचार
करावा. स्वत:च स्वत:शी त्या मुद्यांवर चर्चा करावी.
एखादी घटना घडली नसती किंवा दुसऱ्या पद्धत
घडली असती तर त्याचे परिणाम काय झाले
असते? यासारखे प्रश्न स्वत:लाच विचारावेत.
मात्र असं करत असताना त्या विषयाशीच
चिकटून रहावं.

विचारविनिमय सुरू असतानाच दुसरीकडे
नोट्स काढाव्यात. 
नोट्स लिहिणं म्हणजे
पुस्तकातलं जसंच्या तसं लिहिणं नाही.
त्या विषयाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहून
काढावा. संपूर्ण नोट्स लिहून झाल्यावर
पुन्हा एकदा वाचाव्यात. त्यामुळे रिविजन
करताना पुन्हा पुस्तक
वाचण्यापेक्षा त्या नोट्सवरून नजर फिरवणं
सोयीस्कर जातं.

इतर काही मुद्दे
या परीक्षांची १२ वी नंतर तयारी सुरु
केल्यास उत्तम.

पदवीनंतरही तयारी होऊ शकते

स्वत: अभ्यास करण्याबरोबरच योग्य
मार्गदर्शक निवडा. कारण मार्गदर्शनाशिवाय
ट्रॅक चुकण्याची शक्यता असते.

परीक्षा देण्याच्या एक ते दीड वर्ष
आधी अभ्यास सुरू करा.

आधी मेन्स मग प्रिलीम अशा क्रमाने अभ्यास करा.

प्रिलिमच्या परीक्षेसाठी अभ्यास करण्यास
९० दिवस पुरेसे आहेत.

विषय निवडताना विषयाची आवड, गोडी,
उपलब्ध साहित्य आणि मार्गदर्शन लक्षात
घ्यावं.
अभ्यासासाठी विविध विषयांची पुस्तकं,
नियमित वृत्तपत्रं वाचावीत आणि त्यावर
डिस्कशन करावीत.

१० वर्षांपासूनचे पेपर बघावेत. जेणेकरून
परीक्षेचा अंदाज येतो.
गाइड, मासिकं - क्रोनिकल, विझार्ड, सीएसआर,
दर्पण, स्पर्धा परीक्षा , चाणक्य मंडळ,
लोकराज्य

पुस्तकं - के सागर, दत्ता सांगलोकर, दांडेकर
आदींची पुस्तकं