नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

एम.पी.एस.सी. ची परिक्षा १८ मे रोजीसर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्वपरीक्षा आता १८ मे रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी दिली. ही परीक्षा ७ एप्रिल रोजी होणार होती. मात्र, आयोगाच्या संकेतस्थळावरील डेटा करप्ट झाल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आयोगाने विद्यार्थ्यांना आपली माहिती पुन्हा एकदा अपडेट करण्याची सूचना दिली होती. पूर्वपरीक्षेसाठी राज्यभरातून २ लाख ९८ हजार विद्यार्थी बसणार आहेत. यापैकी २ लाख ६0 हजार विद्यार्थ्यांनी आपली माहिती अपडेट केली आहे. शिल्लक ३८ हजार विद्यार्थी अजूनही www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर माहिती अपडेट करू शकतात, असेही ठाकरे यांनी सांगितले.