नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

Weekly Current Affairs - 3 Dec 2012 to 9 Dec 2012


आंतरराष्ट्रीय

 • फिलीपाइन्समध्ये आलेल्या बोफा वादळातील बळींची संख्या ४७५ वर गेली असून, दोन लाखांहून अधिक नागरिकांना या भीषण वादळाचा फटका बसला आहे
 • एलजी, फिलिप्स, पॅनॉसॉनिक,तोशिबा कॉर्प,सॅमसंग आणि टेक्निकलर ह्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील सहा दिग्गज कंपन्यांना युरोपीय आयोगाने तब्बल 10,500 कोटी रुपयांचा (1.47 अब्ज युरो) आर्थिक दंड ठोठावला आहे. या कंपन्यांनी संगनमत करून कॅथोड-रे ट्यूब्जच्या किमती वाढवल्याचे सिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
 • नारळाचा स्वाद असलेली अननसाची जगातील पहिली प्रजात ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी तयार केली.
 • संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद कतारमधील दोहा येथे संपन्न.
 • क्योटो प्रोटोकॉलच्या पहिल्या टप्प्याची मुदत 31 डिसेंबर 2012 रोजी संपणार आहे. दुस-या टप्प्याबाबत अजूनही एकमत होऊ शकलेले नाही.
 • मालदीव सरकारने येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरणाचा प्रकल्प भारतीय कंपनीकडून (GMR) काढून घेतल्यामुळे भारत सरकारने मालदीवला दिली जाणारी आर्थिक मदत थांबविली आहे.

राष्ट्रीय

 • उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारने पूर्व उत्तर प्रदेशात कुशीनगर येथे भगवान गौतम बुद्धांची जगातील सर्वात उंच मूर्ती स्थापन करण्याच्या योजनेला हिरवा कंदील दर्शवला आहे. कुशीनगर येथे बुद्धमूर्ती स्थापन केली जाणार असून त्यावर जवळपास 1500 कोटी रुपये खर्च येईल,कुशीनगर हे भगवान बुद्धांचे निर्वाणस्थळ आहे
 • केंद्र सरकारने इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी हस्तांतरित करण्याचे संसदेत जाहीर केले.
 • केंद्र सरकारच्या २९ कल्याणकारी योजनांतर्गत अनुदानित रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँकखात्यात जमा करण्याच्या रोख हस्तांतर (डायरेक्ट कॅश ट्रान्सफर) योजनेची घोषणा गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांच्या काळात करणे चुकीचे होते, असा ठपका केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारवर ठेवला आहे. ही घोषणा आचारसंहितेच्या वातावरणास बाधक असल्याचे सांगत या योजनेची गुजरात आणि हिमाचलमध्ये अंमलबजावणी करू नका, असे आदेशही आयोगाने सरकारला दिले
 • कर्नाटकाचे माजी मुख्‍यमंत्री बी एस येडियुरप्‍पांनी केली कर्नाटक जनता पक्षाची स्‍थापना
 • अयोध्येमध्ये बाबरी मशिद पाडल्याला घटनेला २० वर्ष पूर्ण.प्रादेशिक

 • महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी पुन्हा अजित पवार
  अजित पवार यांनी २५ सप्टेंबरला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
 • कोकणातील सहकार क्षेत्रामध्ये गेली सुमारे तेवीस वष्रे पारदर्शी कारभार करीत स्पृहणीय कामगिरी केलेल्या स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला राज्य शासनातर्फे 'सहकार भूषण' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
 • मराठी साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कारासाठी ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता ('झिम्मा' आत्मकथा), यशवंतराव गडाख ('अंतर्वेध' व्यक्तिचित्रण) व डॉ. महेंद्र कदम ('आगळ' कादंबरी) यांच्या साहित्यकृतींची निवड झाली आहे
 • भारतीय भाषा क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधन कार्याबद्दल येथील खांडबहाले डॉटकॉम या संकेत स्थळाचा 'युनायटेड नेशन्स वर्ल्ड समित ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी'कडून आंतरराष्ट्रीय 'मंथन' पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. दक्षिण आशिया खंडात प्रादेशिक भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणाऱ्या उपक्रमांकरिता हा पुरस्कार दिला जातो.

 • व्यावसायिक रंगभूमीवर वैशिष्टय़पूर्ण नाटय़मुद्रेचा ठसा उमविणारे ज्येष्ठ संगीत रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांना यंदाचा संगीताचार्य बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे
 • ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांना यंदाचा 'गदिमा' पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • मराठी साहित्य आणि रंगभूमीवरील बहुआयामी व्यक्तिमत्त्व कै. पु. ल. देशपांडे यांच्या योगदानाच्या स्मृती जागवणारा 'पुलोत्सव' हा बहुरंगी कार्यक्रम येत्या ७ डिसेंबरपासून रत्नागिरी येथे , यंदा त्यामध्ये बुजुर्ग रंगकर्मी विजया मेहता यांना 'पुलोत्सव सन्मान' पुरस्कार.
 • राज्यातील सर्व शाळांना आता मूलभूत सुविधांपासून शिक्षकांपर्यंत सर्व सुविधा देणे बंधनकारक ठरले असून, या सुविधा आहेत किंवा नाही हे तपासून दर तीन वर्षांनी शाळांना मान्यता घ्यावी लागणार आहे. सुविधा न देणार्‍या शाळांना द्रव्य दंडापासून मान्यता रद्द पर्यंतच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.


परिघा पलीकडचे

 • शेतकऱ्याचं आयुष्य आणि ग्रामीण भागातील आरक्षणाचं वास्तव चित्रित करणाऱ्या लेखक आसाराम लोमटे यांच्या 'बेईमान' कथेवर 'सरपंच भगीरथ' हा चित्रपट होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे करणार आहेत.
 • फेसबुकने अँड्रॉइड फोनसाठी नवीन संदेश उपयोजन (न्यू मेसेंजर अ‍ॅप) सुरू केले असून, त्याच्या मदतीने फेसबुक खाते नसलेल्यांसह सर्वजण एकमेकांना फोनवरून संदेश पाठवू शकतील व ग्रहण करू शकतील.
 • एसएमएस म्हणजेच लघुसंदेश सुविधेला ३ डिसेंबरला वीस वर्षे पूर्ण