नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार
महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा केला जाणारा हा सन्मान आहे. (ह्याच नावाने इतरही काही संस्था/ वृत्तपत्रे पुरस्कार देतात पण खालील माहिती केवळ महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणार्‍या पुरस्काराशी संबंधित आहे.)
पुरस्काराचे स्वरूप: 5 लाख रुपये रोख , सन्मान पत्र आणि मानचिन्ह
हा पुरस्कार शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकाळात सुरु झाला.
पहिला पुरस्कार महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांना बहाल केला होता.



वर्ष सन्मानार्थी व्यक्ती इतर माहिती
2011 अनिल काकोडकर
क्षेत्र: विज्ञान
  • भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र (बीएआरसी)चे माजी संचालक
  • अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि अणुउर्जा खात्याचे माजी सचिव
2010 जयंत नारळीकर
क्षेत्र:विज्ञान
  • मराठी खगोलशास्त्रज्ञ व लेखक
  • डॉ. फ्रेड हॉयले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी स्थिरस्थिती विश्र्वाचा सिद्धांत मांडला.
  • मराठी विज्ञानकथेचे प्रणेते.
  • खगोल-भौतिकी संशोधन केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘आयुका’ (Inter-University Center for Astronomy and Astrophysics) ही संस्था त्यांनी पुण्यात स्थापन केली.
2009 सुलोचना लाटकर
क्षेत्र: कला, सिनेमा
  • हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलावंत श्रीमती सुलोचना लाटकर अर्थात सुलोचना दिदी.
  • 250 हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटातून काम.
2008 मंगेश पाडगावकर
क्षेत्र:साहित्य
  • ख्यातनाम मराठी कवी
  • 'सलाम' या कवितासंग्रहासाठी यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार
2008 नानासाहेब धर्माधिकारी
क्षेत्र: समाज सेवा
  • नारायण विष्णु धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते.
  • त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत कार्य केले.
2007 रा. कृ. पाटील क्षेत्र:लोक प्रशासन
  • गांधावादी.
  • स्वातंत्रपूर्व ICS सेवे द्वारे नागरी सेवा क्षेत्रात प्रवेश.
  • 'नागपूर कराराचा ' मसुदा तयार केला.
  • भारताच्या पहिल्या नियोजन आयोगाचे (Planning Commission) सदस्य होते.
2006 रतन टाटा
क्षेत्र:उद्योग
  • टाटा समूह ह्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे चेअरमन
2005 रघुनाथ अनंत माशेलकर
क्षेत्र:विज्ञान
  • भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे महत्कार्य.
  • पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटोरी - एन.सी.एल. (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा)चे माजी संचालक
  • सेंटर फॉर सायंटिफीक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (CSIR) चे माजी महासंचालक.
  • बौद्धिक ज्ञानसंपादनाच्या हक्काविषयीचे (पेटंट) धोरण याबाबत त्यांचे योगदान मोठे आहे.
2004 बाबा आमटे
क्षेत्र:समाज सेवा
  • स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्र्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली.
  • भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला.
  • १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते.
2003 डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग
क्षेत्र: समाजसेवा व आरोग्यसेवा
  • सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात.
2002 भीमसेन जोशी
क्षेत्र: कला,संगीत
  • भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक
2001 सचिन तेंडुलकर
क्षेत्र: क्रीडा
  • क्रिकेटचा देव मानला जाणारा हा महान खेळाडू सध्या राज्यसभेचा सदस्यही आहे.
1999 विजय भटकर
क्षेत्र:विज्ञान
  • सी-डॅकचे संस्थापक व पहिले कार्यकारी संचालक
  • परम कार्यक्रम व लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलचे मदतनीस आणि सल्लागार
1997 लता मंगेशकर
क्षेत्र: कला,संगीत
  • भारताच्या महान गायिका
1996 पु. ल. देशपांडे
क्षेत्र: साहित्य
  • लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक